4 तारखेला झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांचा कळस,धानोरी परिसरात पाहणी दौरा…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

आज दिनांक 07.06.2024 रोजी मा. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी कळस, धानोरी भागातील नाले व पावसाळी लाईनची पाहणी केली.

गेल्या आठवड्यात दि .04/06/2024 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस झाला होता,याठिकाणी रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.अनेक चारचाकी दुचाकी वाहनांचे नुस्कान झाले होते. यामुळे कळस येथील द्राक्ष केंद्राकडून येणाऱ्या नाल्यावरील कल्व्हर्टची पाहणी करण्यात आली. सदर नाला खोलीकरण व कल्व्हर्ट स्वच्छ करण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दिल्या.

Advertisement

तसेच धानोरी रस्त्यावरील लक्ष्मी पार्क येथे आर्मी शूटिंग रेंज परिसरातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, माती, गाळ वाहून येत असल्याने रस्ता वाहून गेला, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुनी घरे असून नाल्या चे पात्र  अरुंद आहे. या ठिकाणी रस्त्यावरील राडारोडा हटवून पावसाळी लाईन साफ करण्यात आली जादा लाईन टाकून लोखंडी पावसाळी जाळ्या तातडीने टाकण्यात आल्या. लष्करी अधिकाऱ्यांशी बोलून परिसरातील पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.गंगा आरिया सोसायटी जवळील नाल्याची भिंत पावसाच्या पाण्याच्या दाबाने कोसळली, याची पाहणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांन सोबत आयुक्तांनी केली , त्यावेळी सोसायटीतील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्या सर्व ठिकाणांच्या पाहणीसाठी महापालिकेतील सोबत मनपा आयुक्त पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त मुख्य आयुक्त (ई), मा. अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता रस्ते विभाग मा. किशोरी शिंदे उपायुक्त, परिमंडळ क्रमांक १, मा. श्री.गव्हाणे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मा. दिनकर गोजारे अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण देखभाल-दुरुस्ती, व म.न.पा अधिकारी उपस्थित होते…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!