बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर पुण्यात आंदोलन
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे – बांधकाम कामगारांच्या विविध गंभीर समस्या व प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज (दि. २४ सप्टेंबर) श्रमिक हक्क आंदोलन या नोंदणीकृत संघटनेतर्फे अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
कामगार संघटनेने आरोप केला की, तालुका व जिल्हा पातळीवरील कामगार सहाय्यता केंद्रे (WFC), तपासणी अधिकारी आणि कामगार कार्यालयातील दुर्लक्ष, अयोग्य कार्यपद्धती व गहाळपणा यामुळे कामगारांची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत. तसेच बांधकाम व इतर इमारत कामगार महामंडळाकडून मनमानी पद्धतीने नियम व नोंदणी प्रक्रियेत बदल केले जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून नोंदणीचे पोर्टल सतत बंद असल्याने कामगारांची अडचण वाढली आहे. अर्ज प्रक्रियेत Clarification साठीची ऑनलाईन पद्धत रद्द करून थेट नकार देण्याच्या निर्णयामुळे कामगारांना वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत, अशी नाराजी संघटनेने व्यक्त केली.
या आंदोलनात येरवडा, वारजे, कोथरुडसह विविध भागातील शेकडो बांधकाम कामगार सहभागी झाले होते. आंदोलकांची भेट घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त श्री. पवार यांनी ठोस उपाययोजना असणारी सुधारित कार्यप्रक्रिया तयार करून पुढील १५ दिवसांत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रलंबित प्रकरणांची चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
श्रमिक हक्क आंदोलनाचे सरचिटणीस सागर सविता धनराज यांनी, “महिनाभरात नवी प्रक्रिया लागू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा दिला. तर बांधकाम मजुर सभेचे अझिम नदाफ यांनी महामंडळाने तातडीने मागण्यांची दखल घ्यावी, असे ठामपणे नमूद केले.
या वेळी श्रमिक हक्क आंदोलनाचे अध्यक्ष बी. युवराज, उपाध्यक्ष जगदीश राठोड, तसेच विनेश मेवाडे, प्रतिभा राठोड, बालाजी झुकझुके, आनंद हादीमणी यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते….




https://shorturl.fm/k3SbJ
https://shorturl.fm/JKJPK
https://shorturl.fm/FSETR
https://shorturl.fm/K9cZ6