सहकार नगर पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगारला अटक : २ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹१,०२,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार सागर सुतकर, अभिमान बागलाने व महेश भगत यांना गोपनीय माहिती मिळाली की, के. के. मार्केट परिसरातील स्टार ऑटो गॅरेज समोर एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. तत्काळ सहा. पोलीस निरीक्षक गणेश रायकर व पोलीस उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर यांच्या पथकाने छापा टाकला असता आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

सदर इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव योगेश नामदेव नरावडे (वय २८, रा. पुण्याई नगर, बालाजीनगर, पुणे) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता हातातील रेक्झीनच्या बॅगेतून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

Advertisement

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४२२/२०२५, भा. ह. वि. अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, मा. उप-आयुक्त परिमंडळ २ मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहा. पो. निरीक्षक गणेश रायकर, पो. उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर, सहा. पो. उपनिरीक्षक बापु खुटवड तसेच पोलीस अंमलदार सागर सुतकर, अभिमान बागलाने, महेश भगत, निलेश शिवतरे, अमित पदमाळे, योगेश ढोले, खंडु शिंदे, आकाश किर्तीकर, मारोती नलवाड व रफीक तडवी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


6 thoughts on “सहकार नगर पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगारला अटक : २ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!