पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात असोका विजयादशमी (दसरा) निमित्त भव्य धम्मचक्र प्रवर्तन समता रॅलीचे आयोजन
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
हजारो बौद्ध बांधवांचा सहभाग; पंचशील ध्वज हाती घेऊन एकोपा, समता आणि प्रबोधनाचा संदेश अशा रॅली केवळ एका परिसरापुरत्या मर्यादित न राहता, त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक समन्वयाचे ऐक्य हेच खऱ्या अर्थाने ‘प्रबुद्ध भारता’च्या निर्मितीचा पाया रचेल….
बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर परिसरात असोका विजयादशमी (दसरा) निमित्त ‘बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र प्रवर्तन समता रॅली’ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या रॅलीत परिसरातील हजारो बौद्ध बांधव, महिला व युवकवर्ग सहभागी झाले.
ही केवळ पारंपरिक मिरवणूक नव्हती, तर बौद्ध समाजातील एकता, समता आणि सामाजिक जागर या मूल्यांचा प्रभावी प्रत्यय देणारा कार्यक्रम ठरला. रॅलीदरम्यान सहभागी बांधवांनी हातात पंचशील ध्वज घेत समाजात प्रबोधनाचा आणि ऐक्याचा संदेश दिला.
मिरवणुकीचा प्रारंभ कोंढवा हॉस्टेल चौकातून झाला. इंदिरानगर व महेश सोसायटी मार्गे अप्पर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रॅलीची सांगता त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदनेने करण्यात आली. तसेच डॉ आंबेडकर पुतळा ठिकाणी भव्य अन्नदान करण्यात आले.या प्रसंगी परिसरातील सर्व बौद्ध विहारे, सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी तसेच आंबेडकर जयंती मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असोका विजयादशमी निमित्त झालेल्या या समता रॅलीतून समाजात शांती, समता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाने बिबवेवाडी परिसरात प्रबोधनाचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले…




https://shorturl.fm/JKJPK
https://shorturl.fm/Z8waS
https://shorturl.fm/b1jRm