समता भूमी प्रभाग क्र 26 मधे जनआक्रोशाचा स्फोट! दैनी अवस्थेचा अंत करत जनतेने बदलली सत्ता.
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 26 – समता भूमी (महात्मा फुले स्मारक परिसर) येथे यंदा घडलेले सत्ता परिवर्तन हे केवळ राजकीय बदल नसून,
वर्षानुवर्षांच्या अन्याय, दुर्लक्ष आणि अमानवी अवस्थेविरोधात दिलेला जनतेचा ठाम कौल असल्याचे स्पष्ट होत आहे.
नरकासमान वास्तवाने पेटला जनआक्रोश
समता भूमी परिसरातील
सार्वजनिक शौचालयांची अत्यंत गलिच्छ व आरोग्यास घातक अवस्था
नियमित पाणीपुरवठ्याचा अभाव
जाणीवपूर्वक दुर्लक्षित स्वच्छता व्यवस्था
पुनर्वसनाच्या नावाखाली नागरिकांवर टाकलेला अप्रत्यक्ष दबाव..
प्रभाग क्र. 26 साऱ्या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने प्रभागाची दैनी अवस्था झाली, असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
एकट्याचा नव्हे, तर जनतेचा लढा
हा आवाज केवळ तक्रारीपुरता मर्यादित राहिला नाही.
रमेश साठे आणि अविनाश देवकुळे यांनी या लढ्याला ठाम दिशा दिली.
त्यांच्यासोबत समता भूमीतील सजग, जागरूक व धाडसी नागरिकांनी अन्यायाविरोधात एकत्र उभं राहत सत्ता परिवर्तन घडवून आणलं.
ग्राहक जागृती न्यूज तर्फे अभिनंदन
ग्राहक जागृती न्यूज तर्फे
रमेश साठे, अविनाश देवकुळे आणि समता भूमीतील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
निवडून आलेल्या नगरसेवकांना थेट संदेश
सत्ता मिळणं ही केवळ सुरुवात आहे —
जबाबदारीची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे!
समता भूमीतील नागरिकांच्या अपेक्षा स्पष्ट आणि ठाम आहेत 👇
✔ सार्वजनिक शौचालयांना नियमित पाणीपुरवठा
✔ दररोज स्वच्छता व देखभाल
✔ महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी
✔ कोणताही पुनर्वसन प्रस्ताव असल्यास पूर्ण पारदर्शकता व नागरिकांची संमती
✔ महात्मा फुले स्मारक परिसराची सन्मानपूर्वक निगा
पुन्हा दुर्लक्ष झाल्यास… रस्त्यावर उतरण्याचा इशारा
जर पुन्हा एकदा
दुर्लक्ष, टाळाटाळ किंवा मागील काळातील अमानवी परिस्थिती निर्माण झाली,
तर समता भूमीतील जनता पुन्हा रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा ठाम इशारा नागरिकांनी दिला आहे.
✍️ शुभेच्छा… पण सावध इशाऱ्यासह
निवडून आलेल्या नगरसेवकांनी
हा जनविश्वास फक्त शब्दांत नव्हे, तर कृतीतून सिद्ध करावा,
नागरिकांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून द्यावा,
आणि समता भूमीचा इतिहास बदलावा —
यासाठी शुभेच्छा… पण सजग जनतेच्या सावध नजरेखाली!


This was useful. A well-structured platform really changes how people experience adult content
My page :: gay tube