बारामती लोकसभा मतदारसंघातील जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला…
पुणे प्रतिनिधी :- लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्पातील निवडणूक रंगतदार लढत ठरणार आहे. त्यासाठी 7 मे रोजी होणाऱ्या मतदानावर साऱ्या देशाचे लक्ष बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे लक्ष वेधून घेतले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सारोसर्वा तथा उपमुख्यमंत्री यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे . तसेच शरद पवार व अजित पवार यांच्यातील प्रचारात नवनवीन युक्त्या , प्रचारातील भावनिक साध , घालण्याचे प्रयोग होताना दिसत आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांचे पारंपरिक जेथे वेळोवेळी सांगता सभेचे मैदान अजित पवार यांनी हायजॅक केल्याची चर्चा बारामती मध्ये आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती मतदारसंघावर मजबूत पकड आहे . तसेच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे गुलाल कोण उधळणार याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे .
बारामती मतदारसंघात 38 उमेदवार रिंगणात असेल असले तरी खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांच्यात अटी तरी चा सामना रंगात रंगला आहे. या लढतीत बारामतीकर कोणाच्या बाजूने कौल देतात हे आता स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लढतीकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.


