सरकार पाडण्यासाठी तसेच मते खरेदी करण्यासाठी निवडणूक निधीचा वापर :- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण


काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी व भाजपा पक्षाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आरोप केले.

भाजप निवडणूक (निधी), रोखे हे बेकायदेशीर आहे. त्यांनी सांगितले की एखाद्या कंपनीचा नफा झाला असेल तर त्यांना साडेसात टक्के निवडणूक निधी देण्यात येतात देणगीदार मध्ये 100 कोटी ते 1000 कोटी निधी कुठून येतो . याबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या. भाजपाने निवडणूक प्रक्रिये व अन्य माध्यमातून विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा केला आहे. त्याचा वापर सरकार पाडण्यासाठी तसेच मते खरेदी करण्यासाठी करण्यात आला मात्र भाजपाने पैशाचा कितीही वापर केला तरी बहुमत इंडिया आघाडीलाच मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या अधिक जागा येतील निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट आहे. निवडणुकीच्या प्रारंभी भाजपाने 370 जागा तसेच 405 ची घोषणा केली होती. आता त्याचा उल्लेखि करत नाहीत. देशाची राज्य घटना बदलण्यासाठी त्यांना लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत हवे आहे. मोदी यांनी दहा वर्षाच्या कामकाजावर आणि पुढे काय करणार यावर मते मागणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडे मुद्देच नसल्याने त्यांना राहुल गांधी व काँग्रेसच्या जाहीरनामा बोलण्याची वेळ आली आहे. असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!