हेमंत करकरे यांना संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्यांनी गोळी झाडली :- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

मुंबईतील 26 11 च्या दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटले . पोलीस दलातील आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवादाच्या बंदुकीतील नव्हती तर संघ परिवार समर्थक पोलीस अधिकाऱ्यांनी झाडली असल्याचे वादग्रस्त विधान केले…
भाजपाचे उत्तर मुंबई मध्ये उमेदवार ऍड . उज्वल निकम यांनी हे प्रकरण न्यायालयापासून लपवून ठेवण्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
याबाबत विजय वडेट्टीवार यांनी एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकातून दाखला दिला असल्याचे सांगितले .या मुळे भाजप, संघ परिवार ,व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर निवासस्थानी तीव्र आंदोलन केली .
Advertisement
ऍडव्होकेट उज्वल निकम यांनी सांगितले विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप हे निराधार आहेत. मला याबाबत वाईट वाटते. त्यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहित नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आपल्या देशाची प्रतिमा मलीन करत आहात याच आश्चर्य वाटते. विरोधी पक्षांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवत असल्याचे समजते


