बिबवेवाडी येथील पिंगारा रेस्टॉरंट अँड बार वर उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई…


बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर मधील पिंगारा रेस्टॉरंट अँड बार 1 मार्च कामगार दिना व महाराष्ट्र दिनी निमित्त शासनाने घोषित केलेल्या ड्राय डे ला चोरून दारू विकत असल्याने या बार वरती उत्पादन शुल्क विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या मदतीने यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

कारवाई मध्ये बारच्या मालकावरती दि. ०२/०५/२०२४ रोजी विभागीय विसंगती गुन्हा नोंद केलेला आहे. केलेल्या कारवाईचा विस्तृत अहवाल मा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क , पुणे यांना सोमवारी पाठवण्यात आला आल्याचे उत्पादन शुल्क निरीक्षक दळवी यांनी सांगितले.

Advertisement

मिळालेल्या माहिती अनुसरून पिंगारा बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी 1मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी महाराष्ट्र शासनाने ड्राय डे घोषित केला असताना संबंधित बार मालक नफेखोरी करण्यासाठी विदेशी दारूची विक्री MRP पेक्षा दुप्पट तिप्पट दराने विक्री करत असल्याचे ग्राहक हक्क संघर्ष समिती या संघटनेला समजले त्या नुसार व्हिडिओ फुटेज घेऊन संबंधित प्रशासनाला मेल द्वारे तक्रार केली
McDowell कॉटर:- 160 रुपये त्याची विक्री 320 रुपये
रॉयल स्टॅग 180 रुपये ची कॉटर 400 रुपये विक्री होत होती .अश्या प्रकारे सर्व ब्रँडच्या दारूची विक्री होत होती.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर विभागाच्या भरारी पथकानं १ जानेवारी ते 4 जून पर्यंत  कालावधीत छापे टाकणार असल्याचे सांगितले ….

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!