मुंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, नाशिक व जळगाव या परिसरातून घेतले ताब्यात…


उच्चभ्रू परिसरात बीटी कवडे रोड, या ठिकाणाहून पायी चालत जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी सदर महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेल्याने महिलेने मुंढवा पोलीस ठाणे येथे दिले तक्रारीवरुन अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीमधे इसमांने अंदाजे २ लाख,४५ हजार,- रु. किंमतीचे सोन्याचे चैन असलेले मंगळसुत्र, लक्ष्मीचे कॉईन असे हिसकावून नेल्याने चोरीस गेले आहे.असे सांगितले.

घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन सदर परिसरातील व आजु-बाजूंच्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणे करीता तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांच्या दोन टिम तयार करुन हद्दीत परहद्दीत रवाना केले. तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक, अनिल बिनवडे व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीतांची माहिती प्राप्त करुन दाखल गुन्हयातील आरोपी नाशिक व जळगाव जिल्हा येथून अशा वेगवेगळया ठिकाणारुन दोन आरोपींना ताब्यात घेवून दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयात चोरीस गेलेला काही किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम, सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस उप-निरीक्षक, अनिल बिनवडे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश (नाना) भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत पेरणे, सचिन पाटील, स्वप्निल रासकर, किरण बनसोडे यांनी केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!