मांगडेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांना अभय PMRDA चे अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन बांधकामांना मूक संमती….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभागाकडून कात्रज मांगडेवाडी,जांभूळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत नसून अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक व PMRDA चे अधिकारी यांची छुपीयुती असल्याचे दिसते. प्रशासनाला अनधिकृत बांधकामची माहिती देऊन ही कारवाई होताना दिसत नाही…

Advertisement

पुणे शहारा लगत कात्रज मांगडेवाडी परिसरातील बांधकाम व्यवसायिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृत बांधकाम सर्रास बांधत आहेत. PMRDA चे अधिकारी दिखाऊ पानाची कारवाई करून बांधकामांना अभय देत असल्याचे दिसते. मांगडेवाडी सर्व नं. 22/1अ /1 या ठिकाणी जगदंबा कन्स्ट्रक्शन व डेव्हलपर यांच्या साईट वर अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक व राम राज्य सहकारी बँकेचे संचालक यांनी दि. 16/06/2023 रोजी दिली असता अद्याप कारवाई करण्यात चालढकल करण्यात PMRDA चे अधिकारी धन्यता मानतात. असे असताना तक्रार दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत तक्रारींचे निवारण कारणे अपेक्षित असताना अद्याप कारवाई करण्यात आली नाही. अश्या अनधिकृत बांधकामामुळे मोठया प्रमाणात ग्राहक फसला जातो. तसेच शासनाचा महसूल ही मोठया प्रमाणात बुडत आहे. ग्राहकांना बांधकाम व्यावसायिक खोटे सांगून आपले फ्लॅट विक्री केली जाते. संबंधित अधिकारी व बांधकाम व्यवसायिकांची छुपी युती असल्याने कारवाई करत नाही.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त व
वरिष्ठ अधिकारी अनधिकृत बांधकामांना मूकसंमती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बांधकाम विभागा मार्फत शासनाला मोठया प्रमाणत महसूल प्राप्त होत असतो. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे महसूलत घट होऊन शासनाचे मोठया प्रमाणत महसूल बुडतो अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!