महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय 44 अंश सेल्सिअस तापमान :- हवामान विभागाने दिला सावधानतेचा इशारा…


Advertisement

     पुणे :- महाराष्ट्रात प्रथमच पारा 44 अंश सेल्सिअस वर गेला आहे. हंगामातील हंगामतील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राज्यात जणू उष्णतेचा वनवास पेटला आहे. असे चित्र दिसते. पुण्यातील तळेगाव ढमढेरेचे तापमान 44 अंशावर गेल्याने हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली

महाराष्ट्रात प्रथमच पारा 44 अंश सेल्सिअस वर गेला आहे. हंगामातील हंगामतील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राज्यात जणू उष्णतेचा वनवास पेटला आहे. असे चित्र दिसते. पुण्यातील तळेगाव ढमढेरेचे तापमान 44 अंशावर गेल्याने हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली . मंगळवारी कोकणासह राज्यात सर्वत्र कमाल तापमानात मोठी वाढत झाली. उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पारा प्रथमच 44 अंशावर गेला त्यामुळे हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
मंगळवारचे कमाल तपमान मालेगाव 44, तळेगाव ढमढेरे 44, पुणे शहर 41.8 अहमदनगर 40.2 कोल्हापूर 39.4 महाबळेश्वर 33.6 नासिक 39.4 सांगली 41 सातारा 40.7 सोलापूर 42.9 छत्रपती संभाजीनगर 41.4 परभणी परभणी 40.8 नांदेड 42.8 बीड 42 अकोला 42.3 चंद्रपूर 41.8 गोंदिया 38.2 नागपूर 40.1 वर्धा 41
पुणे शहरात तपमान सतत 42 ते 43 अंशावर जात आहे एप्रिलमध्ये सलग दहा ते पंधरा वेळा तापमान 42 अंशावर गेले आहे तसेच मगरपट्टा, वडगाव शेरी, लोहगाव, सिटी एरिया , औंध, पाषाण, बाणेर, या ठिकाणी उष्णतेने अंगाची लाही लाही होत आहे.
शहरात सतत गुजरातमधील वाळवंटातून उष्ण वारे येत आहे त्यामुळे उष्मा जास्त जाणवत आहे शहरातील बहुतांश भागातून उष्णता बाहेर पडत नाही त्या मुळे रात्रीच्या तापमानात सातत्याने वाढ होते असे हवामान तद्यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!