पुणे लोकसभा मतदार संघात निवडणुकीतील चारही प्रमुख उमेदवार पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक…

पुणे :- पुणे लोकसभा मतदार संघात यंदा चौरंगी लढत होणार असून पहिल्यांदा चारही उमेदवार हे पुणे महानगर पालिकेचे चे माजी नगरसेवक आहे. या उमेदवाराकडून पुण्याच्या भविष्याचा आराखडा मांडला जाण्याची पुणेकरांची अपेक्षा असली तरी वैयक्तिक पातळीवर टीका करत वॉटर मीटर व गटार या तिन्ही प्रश्नावर बोलण्याचा भर दिल्याने त्याचा प्रचाराचा दर्जा ही घसरला आहे.
केंद्राकडून पुण्यासाठी कोणत्या नवीन योजना आणणार दूरदृष्टीपणा प्रचारात अभावाने असल्याचे यंदाची निवडणूक ही लोकसभेपेक्षा पुणे महानगरपालिकेच्या पातळीवर पोहोचण्याचे चित्र निर्माण झाले आहे .भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, आणि एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके हे पुणे महानगरपालिकेचे माजी माजी नगरसेवक आहे पुणे शहराचे माजी महापौर स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले आहे. धंगेकर हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी निवडून येईपर्यंत ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक वसंत मोरे हे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते पुणे महानगरपालिकेचे गटनेते होते. आणि अनिस सुंडके हे आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये होते आई निवडणुकीत ते एमआयएम मध्ये आले अनिस सुंडके हे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते चौघांची राजकीय कार्यकर्ते ही पुणे महानगरपालिकेत घडली असल्याने प्रचारामध्ये ज्या उमेदवाराकडून पाणी, वीज, सांडपाणी, व्यवस्था या प्रश्नाभोवती फिरत असणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुणे लोकसभा तील आजवर खासदारांपैकी अण्णा जोशी गिरीश बापट आणि शिरोळे हे पुणे महानगरपालिकेत भाजपाचे नगरसेवक होते मात्र त्यांच्यासमोर असलेले उमेदवार हे नगरसेवक नसल्याने प्रचारात पुण्यासाठी केंद्राकडून कोणते प्रकल्प आणणार यावर भर देण्यात येत असे मात्र यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच चारी प्रमुख उमेदवार हे नगरसेवक असल्याने वैयक्तिक टीका आणि पुण्यातील स्थानिक प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येत आहे.


