हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट पुणे येथील हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीत दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगार दोन दिवसात अटक …


पुणे – हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट , हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीत चोरी करणाऱ्या आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक , गुन्हे शाखा, यांच्या कडून अटक करण्यात आली आहे, सदर गुन्ह्यांमध्ये ६ आरोपींना अटक करण्यात आले असुन . सदर आरोपी यांचेकडुन वानवडी पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

आरोपी यांचेकडुन चोरी केलेल्या तांब्याच्या दोन पट्या, व गुन्ह्यात वापरलेला एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, तसेच एक पक्कड कटर, असा एकुण ३ लाख, ९० हजार,२०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे,
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलीस फौजदार अशोक आटोळे, यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हडपसर इंडस्ट्रीयल एरीआ, हडपसर, पुणे येथील हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीतुन दोन वेळा तांब्याच्या पट्या चोरी करणाऱ्या इसमांपैकी त्याचे तोंड ओळखीचा इसम अब्दुल साह रा. चिखली, पुणे सध्या रा. नारायणगांव, पुणे हा त्याचे साथीदारां सोबत पुन्हा हडपसर इंडेस्ट्रीयल एरीआ मधील दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने पाहणी करणेकरीता आलेला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

Advertisement

त्याप्रमाणे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हडपसर इडेस्ट्रीयल एरिआमध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे १) अब्दुल कलाम रहेमान साह, वय २४ वर्षे, रा. मोरेवस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे सध्या रा. कोल्हे मळा, नारायणगाव जि. पुणे मुळगाव मु.पो. कळजा, ता. बेलवाह, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश २) प्रेमसागर सुमीरन कनोजिया, वय १९ वर्षे, रा. नेवाळेवस्ती, चाळीस रुम, कुदळवाडी, चिखली, पुणे मुळगाव रेहाराअर्फा, भेसाही, ता. इटवा, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश ३) शकील अहमद मन्सुरी, वय २४ वर्षे, रा. म्हाडा बिल्डींग, फ्लॅट नं. ५५, क्रांतीनगर, साकीनाका, मुंबई मुळगाव मु. खैरा, पोस्ट ढोसळ ता. भानपुर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश ४) रिजवान ऊर्फ अहमद रामुल्ला खान, वय १९ वर्षे, रा. सदर मुळगांव मु. धुनिया, पोस्ट बडनी, ता. शौहरतगढ, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश ५) सोमनाथ गणपत कोडीतकर, वय ३८ वर्षे, रा. जैन मंदिर, दुग्गड पुष्प विद्यालयामागे, कात्रज, पुणे मुळगाव मु.पो. हिरपुडी, ता. वेल्हा, जि. पुणे ६) अनिल अनंता रेणुसे, वय ३४ वर्षे, रा. राममंदिराशेजारी, आंबेगाव, पुणे मुळगाव मु. पो. पाबे, रामवाडी, ता. वेल्हा जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आलेले असुन, सदर ताब्यात घेतलेले इसम हे घटनास्थळी असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेज मधीलच असल्याची खात्री झालेली आहे. सदर आरोपी यांचेकडुन चोरी केलेल्या तांब्याच्या दोन पट्या, व गुन्ह्यात वापरलेला एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, तसेच एक पक्कड वजा कटर, असा एकुण ३,९०,२००/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील आरोपी यांचेकडुन वानवडी पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!