कृत्रिम नाल्या मुळे आंबील ओढ्याकाठच्या लाखो लोकांचे जीव पुन्हा धोक्यात …



पुणे :- बिबवेवाडी परिसरातील टेकड्यांवरील विशेषता गंगाधाम परिसरामध्ये उभारत असलेल्या टोलेजंग बिल्डिंगमुळे पावसाचे पाणी अडवणूक केल्या मुळे तिकडचे पाणी महेश सोसायटी चौकाच्या बाजूने के.के मार्केटच्या बाजूला कृत्रिम नाला उभा करायचे काम सत्ताधारींच्या आशीर्वादाने प्रशासनाने सुरू केल्याचे दिसून येत आहे. पण वस्तुतः जवळच बिबवेवाडी परिसरातील उपनाला उत्सव बिल्डिंग च्या शेजारून महेश सोसायटी इंदिरानगर चैक पर्यंत हा वाहत असताना त्याला जोडणे नैसर्गिक रित्या अपेक्षित आहे.  पण महापालिका प्रशासना काडून बिबवेवाडी परिसरातील डोंगरावरचे पाणी कृत्रिम रित्या के.के मार्केट येथे आंबिल ओढ्याला जोडण्याचं काम सुरु आहे .                                                                                                                                                     या बाबत पुणे मनपाचे आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली.. संबंधित स्पाॅटला मी व्हिजिट करण्याचे त्यांनी सांगितले होते. या बाबत त्यांचा आज आंबील ओढ्याचा पाहाणी दौरा होता. सामाजिक कार्यकर्ते नितिन कदम यांनी आयुक्त यांना सविस्तर माहिती दिली  
                    https://youtu.be/S9094BpalcY                                                             25 सप्टेंबर 2019 ला आंबिल ओढ्याला आलेला पूर आपण सर्वांनी पाहिला. ओढ्याकाठी राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली.. सहा जणांना जीव गमवायची वेळ आली. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. त्याच्यावर उपाययोजना नाला रुंद करणे, खोल करणे, सीमा भिंत बांधणे, अतिक्रमण काढणे अशा सर्व बाबींचा आम्ही सातत्याने पाठपुरावा प्रसंगी आंदोलन करीत केल्या.
पण दुर्दैव आंबील ओढा काठच्या नागरिकांना या परिसरातील पावसाचे पाणी वळविल्यामुळे पावसाळ्यात निश्चित धोका वाढला आहे. परत एकदा आंबील ओढ्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना आपण जीव मुठीत घेऊन राहण्याशिवाय काही करू शकत नाही ….

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!