अमरावती येथील सराईत गुन्हेगार हडपसर पोलिसांच्या ताब्यात….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

अमरावती येथील सराईत गुन्हेगार आरोपी आकाश गोवींद शेंडगे वय २४ रा. मांजरी पुणे हा नमुद गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. त्यानंतर तिवसा पोलीस स्टेशन कडील पोलीस पथकाने संबधीत आरोपी याचा पुणे परिसरात येवून वारंवार शोध घेवून देखील तो त्यांना मिळून येत नव्हता. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांनी नमुद आरोपी याचा शोध घेण्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे कळवीले होते…

आज दिनांक १९/०७/२०२४ रोजी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि जोतीबा पवार असे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना, गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि जोतीबा पवार यांना नमुद आरोपी हा हडपसर परिसरात असलेची खात्रीलायक माहीती मिळाली. त्यावरून त्यास हडपसर परिसरातुन ताब्यात घेतले. आरोपीस पुढील तपासकामी तिवसा पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

तिवसा पोलीस स्टेशन, अमरावती ग्रामिण गु.र.नं १०८/२०२४ भा.दं. वि. कलम ३९५,३९७,२०१ आर्म अॅक्ट ४(२५), २५ (६), २५ (७) सह बाल न्याय अधिनियम कलम ८३ (२), २७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) अन्वेय गुन्ह्यात अमरावती तिवसा पोलीस स्टेशन अटक केली

सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. आर राजा, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती मंगल मोढवे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, जोतीबा पवार, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!