
दि. २८ /०४/२०२३ रोजी फिर्यादी मूळ गावी सोलापुर शहरात गेले त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावले होते.
परता दि ०२/०४/२०२३ रोजी घरी आले तेव्हा अज्ञात चोरट्याने सदर राहते घराचे बाल्कनीचे ,दरवाचे कडी कोयंडा तोडून
घरा मधे प्रवेश करत घरातील बेडरूम लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाच्या तरी साह्याने उचकटून कपटातील मधील दागिने
व इतर मुद्यामाल हे घरफोडी चोरी करून नेले म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दिल्याने बिबवेवाडी
पोलिस ठाणे गुन्हा रजि. २०१/२०२३ भा.दं.वी.स. कलम ४५४,४५७,३८०,अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्यातील अज्ञात आरोपीचा आरोपीचा वरिष्ठ पोलिस निरक्षक श्री विनायक पाटणकर व पोलिस निरीक्षक
(गुन्हे)श्री मनोजकुमार लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरक्षक प्रवीण काळोखे ,व तपास पथकातील अमलदार
यांनी गुन्यातील अज्ञात आरोपीचे मोडस वरून तसेच फिर्यादी यांच्या कडे केलेल्या चौकशी वरून व तपास पथकातील पोलिस
अमलदार यांना मिळालेल्या बातमी वरून तसेच तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्ह्यातील संशयित इसम दीपक नामदेव
पाटोळे वय ४१ वर्ष रा.युग्मट्विन्स सो.फ्लॅट नं.१०८ पापळ वस्ती रोड बिबवेवाडी पुणे यास अटक करून त्याच्या विरुद्ध
गुन्हा बाबत अधिक तपास करता त्याने गुन्हा केल्याचे काबुल केले. तपासमध्ये त्याच्या कडून घरफोडी व चोरी करून नेलेल
मुदयमाल कि.रु.७,१७०००.०० किमती सोन्या चांदी चे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्हाचा पुढील तपास
साह्य.पोलिस निरक्षक श्री प्रवीण काळूखे करत आहेत.
सदर कामगिरी मा.पो.उप आयुक्त परिमंडल ५ पुणे शहर श्री आर राजा ,मा.साह्य पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे
शहर श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शन खाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर पोलिस निरक्षक श्री मनोजकुमार
लोंडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा निरीक्षक श्री प्रवीण काळूखे,संतोष जाधव ,विशाल जाधव ,आशिष गायकवाड ,
शिवाजी पाटील यांनी केले आहे
Post Views: 75