सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये गोळीबाराचा थरार !


 

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे : सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये थरार, वाडकरने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी देखील स्वः संरक्षणार्थ तीन गोळ्या झाडून वाडकर याचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुठा गावाच्या परिसरात घडली असून पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि केतन साळुंखे याला अटक केली आहे.

Advertisement

नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती. तो खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यात फरार होता. त्याच्याकडे घटक हत्यार असल्याची मदती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – २ ला मिळाली होती. तो मुठा गावच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस मुठा गावाच्या परिसरात गेले. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस तेथे पोहचले. पोलिसांचा पाहून नवनाथ वाडकरने पोलिसांच्या दिशेने १ राऊंड फायर केला. पोलिसांनी देखील स्वः संरक्षणार्थ तीन गोळ्या झाडून वाडकर याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला आणि त्याचा साथीदार केतन साळुंखे याला पकडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!