तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना पुणे महानगरपालिकेच्या निलंबित अधिकार्‍याकडून मारहाण…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

Advertisement

तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना पुणे महानगरपालिकेच्या निलंबित अधिकार्‍याकडून मारहाण…
महापालिकेच्या सेवेतून निलंबित झालेल्या एका अधिकाऱ्याने पुणे महानगरपालिकेच्या दोन तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना व शिवीगाळ करण्याचा प्रकार बुधवारी घडला याची दाखल घेऊन अतिरिक्त आयुक्त यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
महानगर पालिकेच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला संबंधित अधिकारी हा निलंबित आहे. बुधवारी सकाळी तो महा महापालिकेत आला असता प्रवेशद्वारात असलेल्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकाने कोणाकडे जायचे आहे अशी विचारणा केली . संबंधित अभियान त्याने कर्मचारी असल्याचे सांगितले त्यावर सुरक्षारक्षकाने आय कार्डची मागणी केली मात्र त्याने आपण तीस वर्ष महानगरपालिकेच्या सेवेत आहे . मला ओळखत नाही का?
अशी विचारना करत सुरक्षारक्षकाला ढकलून दिले. व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अन्य दोन सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की केली या घटनेनंतर महापालिकेचे सुरक्षा विभागाचे अधिकारी राजेश विटकर यांनी तथा धाव घेऊन हा प्रकार मिटवला मात्र महापालिकेच्या अभियांता असलेल्या कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसात न नेता मिटवण्याचा पवित्रा घेतला दरम्यान याप्रकरणी तथा अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिले आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!