गनिमी कावा युवा संघटनेने घडवले माणुसकीचे दर्शन मुसळधार पावसात वाहून गेलेल्या साळुंखे कुटुंबीयांना दिली आर्थिक मदत..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

       पुणे शहरात व जिल्ह्यात जोराचा पाऊस कोसळत आहे नदी ओढ्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात बिबवेवाडी येथील अक्षय संदेश साळुंखे हा तरुण वाहून गेला होता. त्याच्या मृत्यूमुळे साळुंखे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करून या खर्चातून गनिमी कावा युवा संघटनेच्या वतीने साळुंखे कुटुंबीयांना आर्थिक मदत करून जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संजय वाघमारे यांनी अक्षय साळुंखे यांच्या पत्नीकडे नुकतीच ही मदत सुपूर्त केली. तसेच महापालिकेच्या वतीने या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून साळुंखे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. संघटनेचे पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Advertisement

पुणे महानगर पालिकेने साळूंखे कुटुंबियांना मदत केली नसून. मदतीसाठी पालिके समोर आंदोलन करणार असल्याचे गनिमी कावा सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!