हात चालखीने ए टी एम कार्ड अदला-बदली करुन पैसे काढून फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार जाळ्यात


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

फिर्यादी हे ए टी एम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेले असता तेथील अनोळखी इसमाने फिर्यादी यांना ए टी एम मशिन मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ए टी एम कार्ड पिन नंबर माहिती करुन घेतल्यानंतर हात चालाखी करुन फिर्यादीकडील बँकेचे डेबिट कार्ड घेऊन त्यांना दुसरे बॅकचे डेबिट कार्ड दिले व ए टी एम मध्ये पैसे नाही असे म्हणुन फिर्यादीस जाण्यास सांगितले. व सदर ए टी एम कार्ड व पिनच्या मदतीने आरोपीने फिर्यादी यांचे बँक खात्यातून २९,०००/- रु. काढलेने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २५६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

दि.१८/१०/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक अजित बडे व सोबत तपास पथकातील स्टाफसह
पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वर नमुद गुन्ह्यातील संशयीत आरोपीच्या मिळत्या जुळत्या
वर्णनाचा इसम पोलीस अंमलदार प्रविण दडस यांना जे. एम. रोड येथे दिसून आल्याने त्याचे नाव पत्ता
विचारले असता त्यांने त्यांचे नाव प्रमोद सिताराम यलमर वय ४७ वर्ष रा. जनवाडी, कुसाळकर पुतळा चौक, पुणे असे सांगितले असता त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती पंचनामा केला असता त्याचेकडुन विविध बँकेचे एकुण १२ ए.टी.एम कार्ड व १७,०५०/- रु. रोख रक्कम मिळुन आलेने सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन नमुद आरोपीस वर नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली.

Advertisement

वर नमुद आरोपी यांचेवर पुणे शहरात विविध पोलीस स्टेशनला तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे दाखल असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अजित बडे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त संदिप गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, अतुल साठे, रुपेश वाघमारे. राजकिरण पवार, महावीर वलटे, प्रविण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!