बलात्कारी ,फरार आरोपी निलंबित पोलीस नाईक अखेर खडक पोलीस स्टेशन कडून जेरबंद …


पुणे प्रतिनिधी :- आरोपी दिपक सिताराम मोघे, निलंबित पोलीस नाईक, गुन्हा दाखल झाले दिनांकापासून आरोपी हा अटक टाळण्यासाठी फरार झाला होता, त्याचेवर दाखल झालेले गंभीर गुन्ह्याची दखल घेवून त्यास पोलीस दलातून निलंबीत केले होते. त्यानंतर तो त्याचे मुळ पत्यावर अगर मुळ गावी मिळून येत नव्हता.

आरोपीने मा. सत्र न्यायालय/उच्च न्यायालय येथे वेळो वेळी केलेले जामीनसाठीचे अर्जास विरोध करण्यासाठी वेळोवेळी मा. सत्र न्यायालय, पुणे व मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे कागदपत्रासह हजर राहून आरोपीचे विरुध्द असलेले पुरावे मा. न्यायालयात सादर करुन आरोपीचे जामीनास प्रखर विरोध केल्याने मा. न्यायालयाने आरोपीचे जामीन अर्ज फेटाळून लावलं. आम्ही वेळो वेळी मा. न्यायालयात आरोपी हा अटक टाळण्यासाठी फरार झालेला असल्याचे न्यायालयाचं निदर्शनास आणून देवून आरोपीचे अजामीनपात्र वॉरंट प्राप्त करुन आरोपीचा सर्वतोपरी शोध घेतला असता आरोपीची काही एक माहिती मिळून येत नसल्याने मा. न्यायालयाने आरोपीचा जाहिरनामा प्रसिध्द केला होता. आरोपीचे जामीनासाठी सर्व मार्ग बंद झाल्याने आरोपी दिपक मोधे हा दिनांक १०/०५/२०२४ गंजी श्री.एन.एच.बारी, मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साो, शिवाजी नगर पुर्ण यांचे न्यायालयात हजर झाला असता मा. न्यायालयाने दिलेले आदेशावरुन आरोपीस खडक पोलीस ठाणे, कडील पोलीस उप-निरीक्षक श्री. प्रल्हाद डोंगळे व पोलीस स्टाफने ताब्यात घेवून गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्रीमती, वैशाली तोटेवार, महा. पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे समक्ष हजर केले. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

Advertisement

खडक पोलीस ठाणे, पुणे शहर २९४/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७.३७६(२) (एन), ३/७५, ३९२, ५०६(२), ५०४,३२३, आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) मह १३५ मधील आरोपी दिपक सिताराम मोघे, पोलीस नाईक, हा खडक पोलीस ठाणं, येथे नेमणुकीस असताना मार्च २०२० ते दिनांक ०१/०८/२०२३ रोजी पिडीत फिर्यादी यांनी दिलेल्या माहिती अनुसरून लॉकडाऊनचे कालावधीत घरी जेवण करणेसाठी येवून फिर्यादीस गुंगीकारक औषध असलेले कोल्ड्रींक पिण्यास दिले त्यामुळे तिला आलेल्या गुंगीचा फायदा घेवून त्याने फिर्यादीशी शारिरीक संबंध करुन, त्याची चित्रफित तयार केली. ती चित्रफित फिर्यादीचे ओळखीचे लोकांमध्ये प्रसारित करणेची धमकी देवून तसेच फिर्यादीचे पतीला जिवे ठार मारणेची धमकी देवून, वेळोवेळी फिर्यादीबरोचर जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध केला. तसेच फिर्यादीस वेळोवेळी मारहाण करुन, पिस्तुलचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून, फिर्यादीचे घरातील कपाटातील सोन्याचे मणी मंगळसूत्र, चोकर, सोन्याची कानातील ४ ते ५ टॉप्स, फॅन्सी रिग्ज, मंगळमुत्रातील मणीवाटी, ब्रेसलेट, नाकातल्या २ चमकी, २ अंगठ्या, वेल, पायातील पैंजण असे अंदाजे एकुण ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डॉगल व वनप्लस मोबाईल या सर्व वस्तु व दागिने जबरीने घेवुन गेला, सदरचाबत फिर्यादी यांनी दिलेले तक्रारी वरुन गुन्हा दाखल आहे.

मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साो. शिवाजी नगर पुणे यांचे न्यायालयात हजर करुन सरकारी पोलीस अभियोक्ता श्रीमती. शशिकला बोधिनी यांनी मा. न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मिळणेकामी युक्तीवाद करुन त्याची तपासकामी पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे. पुढील तपास श्री. अमितेशकुमार, मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, श्रीमती. रुक्मिणी गलंडे, महा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग पुणे शहर, श्री. रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री. संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खडक पोलीस दाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शना प्रमाण वैशाली तोटेवार, सहा. पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशनं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!