सहकार नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झोपडपट्या मधे मोठ्या प्रमाणात पैश्याचा पाऊस …


पुणे प्रतिनिधी :– पुण्यात मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. याची तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. उद्या सोमवारी चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.
पुण्यात महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे.

मात्र, निवडणुकीच्या एकदिवस आधीच पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे.

पुण्यातील  समाजसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (sp ) नितिन कदम यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पहिले परिसरातील नागरिकांनी पैशाची पाकिटे नितिन कदम यांच्या कडे आणून दिली आहेत असे धंगेकर यांनी सांगितले.

Advertisement

पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले असून सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिया मांडला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, अशी भूमिका धंगेकरांनी घेतली.

धंगेकरांच्या तक्रारीवर नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त

सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये पैसे वाटप होत असल्याची एक तोंडी तक्रार प्राप्त झाली होती, मात्र कोणताही पुरावा देण्यात आलेला नव्हता. स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पथकासोबत घटनास्थळी भेट दिली. सर्व प्रकारची चौकशी करण्यात आल्यानंतर तक्रारीमध्ये काही तथ्य नसल्याचे पुढं
आलं आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. काही वेळापूर्वी काँग्रेसचे उमेदवार पोलीस स्टेशनच्या परिसरात बसले असून गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करत आहेत. मात्र कोणताही पुरावा नसताना गुन्हा दाखल करता येत नाही..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!