पोलीस दलाच्या दामिनी पथकाची उल्लेखनीय कामगिरी आत्महत्या करणाऱ्या पिढीत महिलेचे वाचवले प्राण…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
महाराष्ट्रात महिलांना निर्भयपणे काम करता यावं रस्त्यावर फिरता यावं. महिलांवर अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी
महाराष्ट्रात पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने पुणे शहरात दामिनी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत पर्वती पायथा परिसरातील एका पीडित महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असा कॉल आल्यावर तात्काळ भरोसा सेलच्या दामिनी पथकातील महिला मार्शल यांनी हालचाल केली..
दिनांक ०८/०१/२०२५ रोजी १२/४० वा. सुमारास शिवाजीनगर दामिनी मार्शल हिने माहिती दिली की, एक महिला या मार्केटयार्ड येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे व तिचे लोकेशन मार्केटयार्ड हद्दीतील दिसत आहे. तेव्हा दामिनी मार्शल ने दिलेल्या माहिती वरून भरोसा सेल. पुणे शहर च्या वपोनी श्रीमती संगीता जाधव व म. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल तात्काळ मार्केटयार्ड दामिनी मार्शल यांच्याशी संपर्क करून त्यांना सदर ठिकाणी जाण्यास सांगितले, तिथे गेल्यावर सदर महिलेचा शोध घेतला असता, सदर महिलेचे लोकेशन पर्वती पो. स्टे. हद्दीतील आलेने त्यानंतर तात्काळ पर्वती पोलीस दामिनी मार्शल यांनी तिचा शोध घेतला असता ती पर्वती पायथा येथे मिळून आली, तेव्हा सदर महिलेस पर्वती दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार सपकाळ व पर्वती दर्शन मार्शल पोलीस अंमलदार भरगुडे व ठाकरे आणि जनता मार्शल पोलीस अंमलदार चव्हाण व मंडलिक यांच्यासह व दामिनी स्वारगेट मार्शल वरील महिला पोलीस अंमलदार धायतडक, मार्केट यार्ड दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार घाडगे यांच्यासह शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. तिथे त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे कारण विचारले असता, तिने सांगितले की, नवऱ्यासोबत काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाले होते. सदर महिलेचे व तिच्या नवऱ्याचे समुपदेशन केले. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांना वरिष्ठांच्या समक्ष नेऊन,सदर महिला यांचे मामा-मामी,पती आणि इतर नातेवाईक यांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन. पुणे श्री सावंत व भरोसा सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव , म. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल भरोसा सेल गुन्हे शाखा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील दामिनी मार्शल वरील स्टाफ व पोलीस स्टेशन मार्शल वरील स्टाफ यांनी केली आहे…

