कोंढवा बु. परिसरात अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून अभय…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगर पालिका उपनगरात कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणत अनधिकृत बांधकाम चालू असताना महापालिका अधिकारी तुटपुंजी कारवाई दाखवून बांधकामाना अभय देण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांन काडून चर्चा आहे.

कोंढवा सर्व नंबर 4/2/3 भगवान महावीर चौक काकडे वस्ती रोड जवळ पठाण चौक कोंढवा बु. या ठिकाणी 7 मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम चालू असून तब्ब्ल चार वेळा बांधकाम विभागाकडून तुटपुंजी दिखाऊपनाची कारवाई करण्यात आली असून नवीन येणारा अधिकारी इमारतीच्या छतला चार भोके पडून निघून जातो बांधकाम व्यवसायिक परत भोके बुजूवून बांधकाम चालू ठेवतो.
या मुळे ही इमारत ढीसूळ झाली असून घर घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होणार आहे. तसेच पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडणार आहे असे असताना ही इमारतीचे काम चालू कसे राहते संबंधित बांधकाम व्यवसायिक यांच्या वर कारवाई करण्यात महापालिका असमर्थ का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Advertisement

संबंधित इंजिनियर अधिकारी शेख साहेब यांनी सांगितले अगोदर दोन वेळेस कारवाई झाली असून या ठिकाणी जॉकटर जात नसून इमारत पाडण्यासाठी मनुष्य बळ जास्त लागते संबंधित बांधकाम व्यवसायिक यांच्या पोलीस कम्प्लेंट दाखल करणार आहे.असे सांगितले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!