रस्त्यावरील खड्डे = मृत्यूची खाई; मानवी हक्कांचे थेट उल्लंघन! — प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांची तीव्र प्रतिक्रिया


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

पुणे :
“रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघाती मृत्यू हे नागरिकांच्या मूलभूत मानवी हक्कांचे उघड उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायालय आता अधिक जलदगतीने कारवाई करेल,” असे स्पष्ट वक्तव्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले.

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे “जागर मानवी हक्काचा” हा कार्यक्रम पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मानवी हक्कांविषयी आपापले विचार मांडले.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, जाधवर लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रीश कुमार, ॲड. शार्दूल जाधवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती महाजन यांनी सत्र न्यायालय परिसरात “मानवी हक्क न्यायालय” असे फलक लावण्याचे आश्वासनही दिले.

वक्त्यांचे ठळक मुद्दे

🔹 प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू = मानवी हक्कांचे उल्लंघन.
पीडितांना नुकसानभरपाईसाठी न्यायालय “वेगवान प्रक्रियेचा” मार्ग अवलंबेल.
न्यायालयात स्वतंत्र “मानवी हक्क न्यायालय” हे फलक लावण्याचे आश्वासन.
समाजात मानवी हक्कांविषयी अजूनही जागरूकतेची कमतरता.

Advertisement

🔹 न्यायाधीश रेवती देशपांडे

आर्थिक अडचणीमुळे कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये, ही आमची बांधिलकी.
विधी सेवा प्राधिकरणाकडून मोफत कायदेशीर मदत व जनजागृती मोहीम सुरू.

🔹 प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर
समाजसेवा ही एकट्या संस्थेची जबाबदारी नव्हे; सामूहिक कर्तव्य.
तरुणांनी प्रेरणा घेऊन समाजातील दुर्बल गटांसाठी सक्रिय योगदान द्यावे.

🔹 ॲड. शार्दूल जाधवर
वकील हे नागरिकांच्या हक्कांचे प्रहरी.
वकिलांनी पैशाच्या मागे न लागता गरीब व शोषितांसाठी न्यायलढा उभा करावा.

📚 “संविधान बोलतंय” पुस्तकाचे प्रकाशन

कार्यक्रमात लेखक विकास कुचेकर यांच्या ‘संविधान बोलतंय’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

🏆 मानवाधिकार पुरस्कार विजेते

सुभाष खुटवड (पत्रकार)
भूषण मंजुळे (अभिनेता)
सुजाता इळवे, सचिन होळकर, प्रतिमा काळे, संतोष जोगदंड

⭐ विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार

समाजबंध सामाजिक संस्था
फ्यूअल ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स
संविधान संवाद समिती
संजीवनी इन्स्टिट्यूट, कराड
मतिमंद मुलांची शाळा (बाळकृष्ण देवधर)
दिशा परिवार
मनोब्रम्हा फाउंडेशन

लोकसेवा परिवार संस्था (सातारा)

ॲड. रशिद सिद्दीकी
ॲड. उमाकांत आदमाने
संजना करंजावणे
प्रकाश बोंदाडे

कार्यक्रमाचे आयोजक

विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, गजानन धराशीवर, मुरलीधर दळवी, संगीत जोगदंड, देव जाधवर (प्राचार्य) व सुरेश वाघमारे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!