महिलेवर गोळीबार करुन पळुन जाणा-या आरोपीस युनिट ०४ ने केले २४ तासांत जेरबंद..
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे बाणेर सारख्या पॉश परिसरात एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना दि. २९/०८/२०२५ रोजी घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार अश्वमित हाऊस विरभद्रनगर बाणेर येथे महीला फिर्यादी हीचेवर एका अनोळखी इसमाने फायरिंग केली होती त्या अनुषंगाने बाणेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला युनिट 4 तपासाची चक्रे तातडीने फिरवून सदर आरोपीचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि. २९/०८/२०२५ रोजी विरभद्रनगर बाणेर पुणे येथे मुलीवर फायरींग करणारा गौरव नायडु हा रेल्वेने जाणेसाठी खडकी रेल्वे स्टेशन येथे येणार आहे. सदर आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, युनिट-४ गुन्हे शाखा पुणे यांनी युनिट-०४ चे एक पथक तयार केले. युनिट-०४ चे पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि. २९/०८/२०२५ रोजी विरभद्रनगर बाणेर पुणे येथे मुलीवर फायरींग करणारा गौरव नायडु हा रेल्वेने जाणेसाठी खडकी रेल्वे स्टेशन येथे येणार आहे. त्याचेकडे पांढऱ्या रंगाची व्हेस्पा गाडी आहे. त्याने अंगात फिकट चॉकलेटी रंगाचा टि शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने युनिट ०४ चे पथक खडकी रेल्वे स्टेशन येथे सापळा लावुन थांबलो. थोड्याच वेळात बातमीतील इसम खडकी रेल्वे स्टेशनकडुन खडकी बाजारकडे जाणाऱ्या रोडला गाडी लपवणेसाठी जात असताना दिसल्याने पोलीस स्टाफच्या मदतीने त्यास घेराव घालुन पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गौरव महेश नायडु वय २५ वर्षे, रा. श्रीरंग रेसिडेन्सी, गायकवाडनगर पुनावळे, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषांगने तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे ताब्यात असलेली मोटार सायकल ही त्याने गुन्हा करुन पळुन जाणेसाठी वापरलेचे सांगुन गुन्ह्यात वापरलेली पिस्टल व तीन जिवंत काडतुसे गाडीच्या डिक्कीतुन काढुन दिले. असा एकुण १,३३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करणेत आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, युनिट-४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील सहा. पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, जहांगिर पठाण, विह गायकवाड, प्रविण भालचिम, तुषार खराडे, विनोद महाजन, अमजद शेख, नागेशसिंग मयुरी नलावडे, रोहीणी पांढरकर यांनी केली आहे….




https://shorturl.fm/wDMf7
https://shorturl.fm/yI3Jc
https://shorturl.fm/kOv8N
https://shorturl.fm/A02H9
https://shorturl.fm/DcAaK
https://shorturl.fm/ZUEIP
https://shorturl.fm/Vxehz
https://shorturl.fm/PemZO
https://shorturl.fm/R0a7G