राज्यात रिक्षा, टॅक्सी चालवून आपली रोजीरोटी कामवणाऱ्य चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

एकनाथ शिंदे यांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. चालकांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण स्थापन केला असून त्यातून टॅक्सी, रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे…

राजकारणात येण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सु्द्धा रिक्षा चालक होते. बहुतेकवेळा स्वत: शिंदे यांनीही याचा उल्लेख केलाय. या टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांनी कल्याणकारी मंडळ निर्माण केली. लाखो टॅक्सी चालकांसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार आहे. चालकाच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिले जाईल. ज्यांची मुले आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केलाय. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल, त्याला ५० हजार रुपये देण्याची तरतूद केलीय. ग्रॅच्युएटी दिली जाईल, यासाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागतील, अशी माहिती शिंदेंनी दिलीय.

Advertisement

या महामंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, तसेच त्यालातसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार देणार, ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्याना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल, त्यांच्या मुलांना कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल. यासोबतच शासनाचा जर्मन सरकारसोबत चार लाख तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवण्याचा करार झाला असून त्याअंतर्गत कुशल चालकांना परदेशी नोकरीसाठी जाण्याची संधी मिळेल.
63 वर्षावरील चालकांना ग्रॅज्युईटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चालकाला वर्षाला 300 रुपये म्हणजे प्रतिमहिना 25 रुपये जमा करावे लागतील तर त्यात उर्वरित भर शासनाकडून टाकण्यात येईल. त्यासाठी उद्योग, खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!