अनैतिक संबंधातून गर्भपाता दरम्यान महिलेचा मृत्यू, मृतदेहासह तिच्या दोन मुलांनाही जिवंत फेकले नदीत..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

गर्भपाताची शस्त्रक्रिया करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकर तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत टाकत असताना प्रेयसीच्या दोन मुलांनी रडून गोंधळ घातला. आपले बिंग फुटू नये यासाठी त्या नराधम प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहासोबत दोन चिमुरड्या मुलांनाही नदीत फेकून दिल्याचा खळबळजनक आणि माणुसकीला वर काळीमा फासणारी घटना  सोमवारी २२ जुलै) सकाळी उघडकीस आली पुणे हादरलं!

विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदी (Indrayani River) पात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला

समरीन निसार नेवरेकर (वय २५, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), इशान निसार नेवरेकर (५ वर्षे), इजान निसार नेवरेकर (२ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तसेच गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. डॉन बॉस्को कॉलनी, सावेडी, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्यासह
गर्भपात करण्यासाठी मदत करणारी  एजंट महिला, कळंबोली (नवी मुंबई)  येथील अमर हॉस्पिटलमधील संबंधित  डॉक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात तळेगाव दाभाडे  पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे

Advertisement

पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात वराळे येथील विवाहित महिला समरीन नेवरेकर बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. तिचा पती कामानिमित्त कतारमध्ये असतो. पोलिसांनी परिसरात
समरीनचे मूळ गाव अक्कलकोट आहे. गर्भपात करण्यासाठी ती ५ जुलै रोजी दोन्ही मुलांसमवेत घराबाहेर पडली. आई-वडिलांना तिने अक्कलकोट येथे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जात असून, तेथे पोहोचल्यानंतर फोन ४, रा. करते, असे सांगितले. त्यानंतर ती रविकांत गायकवाडसोबत कळंबोली येथे गेली. दिवसभरात तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला नाही. घरच्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिसाद दिला नाही

पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे फुटले बिंग
समरीन बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तळेगाव पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. कॉल रेकॉर्डवरून आरोपींना “चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला; मग आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!