आपल्याच नातवाचा खून करणाऱ्या आंदेकर टोळीवर मोक्का अंर्तगत केली कारवाई….
पुणे प्रतिनिधी : गणेश तुम्मा
कुख्यात गँगस्टर सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याच्यासह त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. याप्रकरणी १३ जणांवर ही कारवाई झाली असून, आत्तापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे, तर पाच जणांचा गुन्हे शाखेची पथके, स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकाकडून कसून शोध सुरू आहे. प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२).३(४) चा अंतर्भाव करणे कामी समर्थ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परि ०१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावळे, यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, यांना प्रस्ताव सादर केलेला होता.
मा. वरीष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयातील आंदेकर टोळीतील ०१) आरोपी नामे यश सिध्देश्वर पाटील वय-१९ वर्षे, ०२) आरोपी नामे अमित प्रकाश पाटोळे वय-१९ वर्षे, ३) आरोपी नामे सुर्यकांत ऊर्फ बंडु आण्णा रानोजी आंदेकर, वय-७० वर्षे, ४) आरोपी नामे तुषार निलंजय वाडेकर वय-२७ वर्षे, ५) आरोपी नामे स्वराज निलंजय वाडेकर, वय-२३ वर्षे, ६) आरोपी नामे वृंदावणी निलंजय वाडेकर, वय-४० वर्षे, ७) आरोपी नामे अमन युसुफ पठाण ऊर्फ खान, वय-२५ वर्षे ८) सुजल राहुल मेरगु, वय-२० वर्षे हे दाखल गुन्हयात आरोपीं अटक करण्यात आली असुन इतर आरोपींचा तपास चालु आहे.
प्रत् 1/2 नमुद गुन्हयातील सुर्यकांत उर्फ बंडु आंदेकर (टोळी प्रमूख) यांने आपले अ. गुन्ह्यात सामाईक साथीदार व नवीन साथीदार यांना सोबत घेवून कट रचुन खुन केल जास्त, तरु, यातील आरोपी यांनी जिवे ठार मारणे तसेच तसा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी चोरी करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा सदर स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री. पंकज देशमुख, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा पुणे, श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावळे मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती. अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री चेतन मोरे, समर्थ पो.स्टे, पुणे शहर व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.




https://shorturl.fm/3X3yj
https://shorturl.fm/DLBX7
https://shorturl.fm/AKaj0