पुणे जिल्हा व सासवड परिसरातील खासगी रुग्णालयांची चौकशी करा ग्राहक हक्क संघर्ष समितीचे महेश राऊत यांची मागणी


पुणे जिल्हा प्रतिनिधी : गणेश तुम्मा …

सासवड, ता. 11 (ता. पुरंदर) शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुरंदर तालुका अध्यक्ष महेश राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, सासवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement

 

पुणे जिल्हा व पुरंदर परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या अनियमिततेमुळे रुग्णांची होळसांड होत असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून नफेखोरीच्या माध्यमातून लुट करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या वतीने या प्रश्नावर तीव्र भूमिका घेण्यात आली असून, समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “रुग्णालयांनी रुग्णसेवा ही व्यवसाय नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून करावी. मात्र आज रुग्णालये रुग्णांकडून मनमानी शुल्क आकारून आर्थिक शोषण करत आहेत. हे त्वरित थांबले पाहिजे.”

या संदर्भात प्रशासन व आरोग्य यंत्रणेला लेखी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला. त्यांनी इशारा दिला की, “जर परिस्थिती अशीच कायम राहिली तर समितीच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या या इशाऱ्यामुळे खासगी रुग्णालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे…


3 thoughts on “पुणे जिल्हा व सासवड परिसरातील खासगी रुग्णालयांची चौकशी करा ग्राहक हक्क संघर्ष समितीचे महेश राऊत यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!