ICICI बँकेच्या खंडणीखोर वाहन लोन रिकव्हरी एजंटला खंडणी विरोधी पथक (२), गुन्हे शाखेकडून बेड्या
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक करुन आय.सी.आय.सी.आय बँकेचे रिकव्हरी एंजट असल्याचे सांगुन त्यांची वापरातील बर्कमन टू-व्हिलर मोपेड गाडी कर्जाचे हप्ते थकले आहेत या कारणास्तव स्वतःची कोणतेही ओळख न देता जबरदस्तीने काढुन निघुन जावुन सदरची दुचाकी गाडी परत करण्यासाठी ३७,५००/-रुपये स्वतःचे अॅकाऊंट वरती खंडणी स्वरुपात घेवुन दुचाकी गाडी परत केली नाही अशी तक्रार प्राप्त झाली होती.
नमुद तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी नामे विनोद चंदर चव्हाण वय २३ वर्षे, रा. बिबवेवाडी कोंढवा रोड, गंगाधाम चौक, पुणे याला ताब्यात घेवुन अधिक माहिती घेतली असता आरोपी याने तक्रारदार यांची गाडी बेकायदेशीररित्या घेवुन पैसे स्वीकारुन, त्यांचे गाडीचा परस्पर अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.१३१/२०२४ भा.दं. वि. कलम ३४१,३८४,३९२,४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली आहे.
रिकव्हरी एंजट फायनन्स लोनचे नावाखाली बेकायदेशीररित्या कोणी गाडी घेवुन जात असल्यास सदर व्यक्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात येत असुन अशा घटना होत असल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलीसांन मार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शाना खाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, चेतन आपटे, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, चेतन चव्हाण, आजिनाथ येडे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, गणेश खरात, चेतन शिरोळकर महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.



