पुणे जिल्ह्यात पावसाचा राडा ,खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.
पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत आहे. तर सिंहगड रोडवरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठल्याने (Pune Water Logging) इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.पुण्यात येत्या काही तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि सतत सुरु असलेला पाऊस यामुळे पुण्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संबंधित उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील 48 तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले आहेत.
भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
शितळा देवी मंदिर डेक्कन.
संगम पूल पुलासमोरील वस्ती
कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
होळकर पूल परिसर
पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील शाळा आज राहणार बंद



