पायी चालणा-या नागरीकास मारहाण करुन लुटले भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
फिर्यादी हे विजयलक्ष्मी फरसाण च्या गल्लीत राही स्मृती बंगला, आंबेगाव पठार, पुणे येथुन त्यांचे घरी पायी जात असताना आरोपी नामे पियुष गणेश भरम याने दुचाकी गाडीवरुन येवुन यातील फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांचे खिशातील ९,३००/- रु रोख रक्कम जबरदस्तीने चोरी केली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६१४/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल..
गुन्हयातील आरोपी पियुष गणेश भरम वय २३ वर्षे रा. आंबेगाव पठार पुणे याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे यांना सदरचा आरोपी हा आंबेगाव पठार चिंतामणी ज्ञानपीठ, येथील हायवेकडे जाणा-या रोडवर थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन नमुद आरोपीताचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली दुचाकी गाडी व रोख रक्कम असा मिळुन ५१,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.



