समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मा. नगरसेवक श्री बाळासाहेब उर्फ प्रमोद ओसवाल यांना ‘जैनरत्न’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

राष्ट्रसंत आचार्य भगवंत पूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त पुण्यनगरीतील राजकीय, औद्योगिक, व पत्रकारिता, क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना आनंद दरबार च्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले…

पुणे शहरात व उपनगरात परिसरात कात्रज, बिबवेवाडी, धनकवडी,कोंढवा परिसरात राष्ट्रसंत आचार्य भगवंत पूज्य आनंद ऋषीजी महाराज संस्थेच्या वतीने आनंद दरबार ही संस्था श्री बाळासाहेब धोका हे जैन समाज बांधव व इतर समाज बांधव यांच्या साठी उल्लेखनीय कार्य करत असते

अण्णाभाऊ साठे नाट्यगृह बिबवेवाडी या ठिकाणी
दिनांक 17/08/2024 रोजी आनंद दरबार ही संस्थाच्या वतीने जैनरत्न पुरस्कार, युवारत्न पुरस्कार,तसेच गुरु आनंद कार्यक्षम पत्रकार पुरस्काराचे आयोजन श्री बाळासाहेब धोका यांनी केले.

Advertisement

जैनरत्न पुरस्काराने सन्मानीय नगरसेवक श्री बाळासाहेब उर्फ प्रमोद प्रेमचंद ओसवाल यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्काराने गौरवण्यात आले
तसेच युवारत्न पुरस्कार श्री महेंद्र माणिकचंद जी सुंदेच्या (मुथा) यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारा देण्यात आला तसेच गुरु आनंद कार्यक्षम पत्रकार पुरस्कार दैनिक प्रभात चे पत्रकार माननीय श्री हर्षद जी कांतीलाल कटारिया यांना तर लोकमत चे पत्रकार श्री संतोष प्रकाशजी गाजरे यांना देण्यात आला.

पुरस्काराचे वितरण पुणे शहराचे खासदार केंद्रीय मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व प्रमुख वक्ते म्हणून लोकमतचे संपादक मा.श्री संजयजी आवटे सर यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे आयोजन आनंद दरबार चे मा.श्री बाळासाहेब धोका यांच्या वतीने करण्यात आले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!