सुरक्षा रक्षकाचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीना बिबवेवाडी पोलिसांनी केली 24 तासात अटक


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बिबवेवाडी परिसरातील रम्यनगरी सोसायटी मधे सिक्युरीटी गार्ड म्हणून डयुटीवर असताना दिनांक ०४/०८/२०२४ रोजी पहाटे ०५.०० वाजता फिर्यादी हे रम्यनगरी सोसायटीमधील कोठारे ज्वेलर्स समोर अंगावर शाल घेवुन पडलेले (झोपलेले) असताना दोन अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादीग लाथा मारल्या तसेच हातातील कोयत्याने फिर्यादीचे दोन्ही हातावर व डोक्यामध्ये जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सपासप वार करून गंभीर जखमी केले त्यामुळे फिर्यादीचा उजवा हात फैक्चर झाला असून, डोक्यामध्ये वीस टाके पडले आहेत.

फिर्यादीस मारहाण करणाऱ्या दोन अनोळखी इसमापैकी एक अंगाने जाड असलेल्या इसमाने अंगामध्ये हुडी घातलेली होती व दुसऱ्या अंगाने सडपातळ असलेल्या इसमाने तोंडाला रूमाल बांधलेला होता. अशा मजकुरचा जबाब दिलेने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.. सदर गुन्हा दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपास पथकातील स्टाफ असे मा. मंगल मोढये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मनोजकुमार लोंढे पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज चेक करून अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, विशाल जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने व त्यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून तपास पथकातील आधिकारी व अमंलदार यांनी आरोपी नामे १) प्रतिक सुभाष बिबवे, वय २६ वर्ष रा. गणात्रा कॉम्प्लेक्स डी विंग, फ्लॅट १०, बिबवेवाडी कोंढवा रोड मार्केटयार्ड पुणे. २) क्षितीज विनायक जैनाक वय २२ वर्षे रा.४०२, नवीपेठ गांजवे चौक जवळ, आप्पा पडवळ पथ पुणे..

Advertisement

ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी यास जुन्या भांडणाचे कारणावरून कोयत्याने वार केल्याचे निष्पन्न झालेने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे , तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!