पुण्यातील बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्तेत गाडी चालवून 2 जणांचे जीव घेतला तरीही पुणे पोलिसांकडून आरोपीला रेड कारपेट …
पुणे प्रतिनिधी :- पुण्यात (Pune) एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवत मध्यरात्री दुचाकीवरील दोघांना उडवल्याची घटना घडली. कल्याणीनगर (Kalyaninagar) येथे घडलेल्या या घटनेमध्ये दुचाकीवरील निष्पाप तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना चिरडणारा अल्पवयीन वेदांत अगरवालला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती…

नुकतीच 12 वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. जाताना वडीलांची (विशाल अगरवाल) यांची आलीशान Porsche car घेऊन तो मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंटमध्ये गेला. शहरातील बड्या उद्योजकांच्या 60 ते 70 मुलांनी Cosie restaurant मध्ये दारु ची पार्टी केली. त्यानंतर वेदांत आणि त्याचे ठरावीक मित्र Marriott suits मधील Black नावाच्या पबमध्ये गेले. Black मधील पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांत ने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टाँवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली.
Ballr पब मधील स्टाफ ने घटनास्थळी धाव घेतली. यातील काही प्रत्यक्षदर्शींनी स्कूपला दिलेल्या माहितीनूसार ही धडक एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवर च म्रुत्यु झाला. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला.
या दोन्ही तरूण तरूणी कडे कोणाचेही लक्ष नव्हते. त्यावेळी काही राजकीय व्यक्ती आमदार यांनी अगरवाल यांची बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हर ला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी वेदांत च चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाई चा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी वेदांत अगरवाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले…
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याच्याविरुद्ध अपील दाखल
करण्याच्याही सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीला कोणतीही विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही (CCTV) तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे आता खुद्द गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे लवकरच मृतांना योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



