6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिला..
अंतरवाली सराटी प्रतिनिधी :-
अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे. चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार….
४ जूनला आंतरवली सराटीतून आम्ही उपोषण सुरु करणार आहोत. आम्हाला कोण पडलं, कोण निवडून आलं याचा आम्हाला आनंद नाही. आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे. आम्हाला बाकी कशात आनंद नाही. ४ जूनची तारीख आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आमचं शांततेचं युद्ध आहे त्याच मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची , ज्या केसेस मागे घ्यायच्या ठरल्या आहेत त्या मागे घ्यायच्या, शिंदे समितीचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायचा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. नवीन मागणी कुठलीही नाही. आता सगळा मराठा एकवटला आहे. ६ जून पर्यंत सरकारने आरक्षण द्यावं ते झालं नाही तर आंदोलन बंद करणार नाही. कठोर आमरण उपोषण होणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, 21 ते 24 तारखेपर्यंत दौरा आहे. त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे. चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आमचे लोकं मोठे झाले तर त्यांचा कल्याण होईल. त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतरवालीत एकवठणार आहोत.
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, हैदराबादचा गॅझेट लागू करावा



