आमदार सुनिल टिंगरे चा मोठा खुलासा :- म्हणे राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्या आधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो…


पुणे प्रतिनिधी :- सत्ताधारी आमदार सुनिल टिंगरे कडून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप पुण्यातील वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांना टार्गेट करण्यात येत आहे. मात्र या घटनेवर टिंगरे यांनी खुलासा केला आहे की राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्या आधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे….

टिंगरे म्हणाले, माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. रात्री तीन वाजून 21 मिनिटांनी माझ्या पी एचा मला फोन आला की मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनीही मला फोनवरून माहिती दिली. तसेच विशाल अग्रवाल यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. मी पोलिस स्टेशनला
पोहचलो. त्यानंतर पोलीसांनी मला माहिती दिली. त्यानंतर मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो. मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलीय. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. मी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी करतो आहे.
दरम्यान सुनील टिंगरे यांनी सकाळी फेसबुक पोस्टही केली आहे. अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मिडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!