कोंढवा पोलीस स्टेशन व मकरजी बैतूल माल फाउंडेशन यांच्या संयुक्त रित्या रमजान निमीत्ताने दावत-ए-इफ्तारचे आयोजन..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

दिनांक ०१/०३/२०२५ रोजीपासून मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. सदर रमजानचे औचित्य साधून आज दिनांक ०६/०३/२०२५ रोजी परिमंडळ ५ मधील कौसरबाग, कोंढवा, पुणे येथे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ व परिमंडळ ५ मधील अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने मुस्लिम बांधवांकरीता दावत ए इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

तसेच परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील एकूण ९ पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे व इतर अधिकारी उपस्थित होते. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीसांच्या वतीने रमजानच्या निमीत्ताने मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व रमजान महिना शांततेमध्ये पार पाडण्याबाबत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन इ. बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमास कोंढवा परीसरातील असंख्य मुस्लिम बांधव महिला व पुरुष जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमात दोन लहान मुलींचा उपवास मा पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी फळे देऊन उपवास सोडला पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरात कायदा सुव्यवस्था  सुरळीत राहण्यासाठी मुस्लिम बांधवानी व सामान्य लोकांनी पोलिसांना मदत करावी असे आव्हान केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!