काळेपडळ पोलिसांनी तब्बल 3 लाख 8 हजार 900 रुपये किमतीची अवैद्यगावठी हातभट्टी दारू केली उध्वस्त…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस दि.०४/०३/२०२५रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत स. नं. १३, आदर्शनगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाई मध्ये दारुविक्री करीत असणारा इसम अजित संतोष जयस्वाल यास ताब्यात घेवून सदर ठिकाणा वरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ४४ कॅनमध्ये भरुन ठेवलेली १,५४० लिटर गावठी दारुचा साठा एकुण ३,०८,९००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करुन साठा करणे करीता बनविण्यात आलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले आहे.

काळेपडळ पोलीस स्टेशन कडील सहा पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, स्टाफ असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार दाऊद सय्यद यांना गोपनीय बातमी मिळाली की, स.नं.१३, आदर्शनगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे इसम नामे अजित संतोष जयस्वाल रा. काळेपडळ, हडपसर, पुणे हा एका पत्र्याचे शेड मध्ये गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, वाहतुक करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असलेची बातमी मिळाल्याने बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील व स्टाफ यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता मोठया प्रमाणत गावठी दारू बनवण्याचे साहित्य दिसून आले. त्याबाबत काळेपडळ पोलीस ठाणेस गु.र.नं.५५/२०२५भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ई) (ड) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अमोल फडतरे, संजय देसाई, परशुराम पिसे, कांबळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, शाहिद शेख यांनी केली.



