संतोष देशमुख हत्याखंड प्रकरणी सी आई डी ने अखेर वाल्मिक कराडला ठरवले दोषी ….


बीड प्रतिनिधी :- संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी अपहरण करून करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटकेत असून, आठवा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. तो अटक होण्यापूर्वीच सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, खंडणी, खून आणि अॅट्रॉसिटी ही तिन्ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचा भाग आहेत. याचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे.

वाल्मीक कराड यानेच चाटेच्या माध्यमातून सुदर्शन घुलेला निरोप दिला होता. ‘खंडणीच्या आड कोणी येत असेल, तर त्याला धडा शिकवा’ हा तो निरोप होता. यातूनच सुदर्शन घुले आणि इतरांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे. तसेच, या मारहाणीदरम्यान जयराम चाटे याने एका ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला होता. तो व्हिडीओ कॉलदेखील आता सीआयडीच्या हाती लागला असून, डिजिटल एव्हिडन्स म्हणून तो वापरला जाणार आहे. या सर्व प्रकरणात हा पुरावा महत्त्वाचा मानला जातो. या डिजिटल एव्हिडन्समध्ये सुदर्शन घुले हाच आक्रमकपणे संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!