नऊवारी साज ! “घरंदाज” फॅब्रिक अँड टेलरिंगचे दमदार पदार्पण
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे :- नऊवारी परंपरेला आधुनिकतेची जोड देत “घरंदाज – फॅब्रिक अँड टेलरिंग” या नव्या उपक्रमाचे भव्य उदघाटन 7 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाले. स्वामींनी सारीचे सर्वेसर्वा रियाज भाई (अबू) शेख यांच्या शुभहस्ते रिबीन कट होताच परिसरात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला. उदघाटन सोहळ्यात नावेद शेख आणि जावेद शेख यांची या मान्यवर उपस्थिती लाभून सोहळ्याला अधिक ऐश्वर्य प्राप्त झाले.
घरंदाजचे प्रमुख श्री दत्तात्रय वाबळे यांच्या या स्वप्नपूर्ती सोहळ्याला त्यांचा मित्रपरिवार — चंदू तावरे, सचिन वलसा, रमेश भुजाडे, किरण भाऊ — यांनी आवर्जून उपस्थित राहून मानाचा मुजरा दिला. तसेच त्यांचे शिष्य गणेश तुम्मा, उषा पोळेकर मॅडम, कैलास कुदळे आणि इतर सर्व शिष्य परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव करून कार्यक्रमाला आणखी शोभा चढवली.
“घरंदाज” फॅब्रिक अँड टेलरिंग – सर्व सुविधा एकाच छताखाली या उपक्रमाचे मार्गदर्शक व सर्वेसर्वा दत्तात्रय वाबळे असून, त्यांच्या जेष्ठ चिरंजीव पवन वाबळे आणि पंकज वाबळे यांनी आगंतुक मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करून आभार प्रदर्शन केले.
फॅब्रिक • मॅचिंग • टेलरिंग — तीनही सेवा आता एका ठिकाणी; पुण्यात ‘घरंदाज’ची धडाकेबाज एन्ट्रीने
येथे उपलब्ध होणाऱ्या सेवा —
प्रीमियम क्वालिटी फॅब्रिक
परफेक्ट कलर मॅचिंग
क्लास–वन प्रोफेशनल टेलरिंग
अनुभवी आणि कुशल टीम
नऊवारीच्या परंपरेला आधुनिक फॅशनची जोड देत “घरंदाज” आता पुणेकरांसाठी एक नवीन, विश्वासार्ह आणि दर्जेदार ठिकाण ठरत आहे.



