आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम हरदोली गावात संपन्न


प्रतिनिधी वर्धा :- अर्पित वाहाणे

वर्धा आर्वी स्थानिक हरदोली ग्रामपंचायत जि.प. प्राथमिक शाळा,हरदोली येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने शालेय साहित्याचा वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना शाळेत येऊन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,तसेच निसर्गासोबत परिचय व्हावा.हा प्राथमिक उद्देश या कार्यक्रमाचा होता. याच कार्यक्रमांतर्गत माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सहभाग नोंदविला, यावेळी निसर्गाच्या संवर्धनासाठी वृक्षाचे वाटप विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना करण्यात आले.सोबतच मा. गटविकास अधिकारी कु.सुनीता मरस्कोल्हे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने स्मशानभूमी हरदोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. निसर्ग संगोपणाकरीता जल, अग्नी, वायू, आकाश,भूमी, संवर्धनाकरिता प्रमुख अतिथी प्रा. पंकज वाघमारे सर व मा.ओमप्रकाश मनवर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.कमलेश कामडी (वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हा महासचिव), उद्घाटक मा. ओमप्रकाश मनवर पाटील (माजी पं स.सदस्य कारंजा घा.) प्रमुख अतिथी मा. सुनिता मरस्कोल्हे गटविकास अधिकारी आर्वी) , मा.प्रा.पंकज वाघमारे सर,(मार्गदर्शक) ,मा.राजपाल भगत ( माजी जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी शेतकरी संघटना), मा.सौ विशाखा कळंबे (सरपंच बाजारवाडा-हरदोली) , मा.राजु शेन्द्रे (ग्रामसेवक, बाजारवाडा-हरदोली गट ग्रामपंचायत),मा.सौ अनिता प्रमोद घोडीले,मा.संदिप हिवसे (मुख्याध्यापक जि.प. प्रा.शाळा,हरदोली) मा.विजय कुडे शिक्षक, मा.दर्पण टोकसे ( सामाजिक कार्यकर्ते), मा.ज्ञानेश्वर राठोड ( गोर सेना जिल्हाध्यक्ष नायक संघर्ष ग्रुप),कल्याणी बुरे पोलीस पाटील,प्रेमिला इरपाचे (अंगवाडी सेविका, हरदोली), दुर्योधन जी गोंडाने मार्गदर्शक आदर्श एकता सामाजिक संघटना, सुनील खोरगडे, शेख मैबूब ,किसन रोहणकर, अनिल तायडे,तसेच गावचे पोलीस पाटील आणि आशा वर्कर, मंचावर उपस्थित होते या सर्व मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमर काशिनाथ भोगे यांनी केले तर आभार आयु.प्रमोद घोडीले यांनी मानले. या उपक्रमाची स्तुती गावातील सरपंच तथा ग्रामसेवक अधिकारी व नागरिकांनी केली. संपूर्ण कार्यक्रम आयोजक गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष,आदर्श एकता सामाजिक संघटना,आर्वी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, हरदोली ग्रामातील ग्रामस्थ व संघटनेचे कार्यकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होते व .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!