पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीचे स्केच प्रसिद्ध…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटामध्ये सामुहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीवर तिघा अज्ञात तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणी ही मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. बलात्कार करणाऱ्या तिन्ही आरोपीचा शोध कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखा घेत आहेत.
तरुणीला आणि तिच्या मित्राच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आपण खरोखरच मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं पटवून देण्यासाठी आधी तिन्ही आरोपींनी बोपदेव घाटात या तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी या तरुणीला कारमधे बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेली. तिथे कारमध्ये या तरुणीवर तिघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपींच्या शोधासाठी 10 पथके रवाना केली आहेत.
तसेच कोंढवा पोलिसांनी आरोपीचे स्केच प्रसिद्ध केले असून
वरील इसम हे कोंढवा पोलीस स्टेशन गु रजि नंबर 1122/2024 या गुन्ह्यातील संशयित आरोपींचे स्केच असून त्यांचे बाबत काही माहिती मिळाल्यास खालील नंबर वर त्वरित संपर्क साधावा.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर मो नं 8691999689
पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री. युवराज हांडे मो नं. 8275200947 /9307545045
नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880
यावर त्वरित संपर्क साधावा



