प्रवाशांना जबरदस्तीने लुटुन जबरी चोरी करणा-या रिक्षाचालकांच्या टोळीस केले अटक
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
प्रवास्यांची लूट करून अनेक दिवसापासून फरार असणाऱ्या व पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रिक्षाचालकांच्या लुटारू टोळीला अखेर स्वारगेट पोलिसांनी अटक केली आरोपी विरुद्ध १) सिंहगड रोड पोलीस स्टेशन २) बंडगार्डन पोलीस स्टेशन ३) बिबवेवाडी पोलीस स्टेशन ४) भारतीविद्यापीठपो.स्टे. २) स्वारगेट पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
स्वारगेट येथील कात्रज बिबवेवाडी पीएमपीएमएल बस स्टॅण्डच्या समोरुन दिनांक २७/०९/२०२४ रोजी २१/३० वा.च्या सुमा. बिबवेवाडी पुणे येथील राहते घरी जाण्याकरीता पॅसेंजर रिक्षामध्ये बसले असता सदर रिक्षा चालकाने फोन करायचा आहे असा बहाणा करुन फिर्यादी यांचा चालत्या रिक्षात मोबाईल काढुन घेवुन पर्वती इंडस्ट्रीज जवळील पीएमपीएल बस स्टॉप जवळील सार्वजनिक शौचालय जवळ त्यानंतर स्वामी विवेकानंद रोडने गंगाधाम चौकामार्गे लुल्लानगर परीसारात रिक्षा फिरवुन फिर्यादीकडील रोख रक्कम ५०० रुपये काढुन फिर्यादीचे नातेवाईकांकडुन फिर्यादीचे मोबाईलवर ऑनलाईन ४०००/- रुपये रक्कम मागवुन घेवुन फिर्यादीचे गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने काढुन घेवुन सदर मोबाईलचा पासवर्ड (गगुल पे) विचारुन घेवुन धक्का बुक्की व धमकावुन फिर्यादीस लुल्लानगर ब्रिजजवळ कोंढवा पुणे येथे सोडुन रिक्षामधुन पळुन गेले होते त्यावरुन फिर्यादी यांनी सदर रिक्षाचालक व त्यांचे तीन साथीदार यांचे विरुद्ध तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयातील आरोपींचा शोध घेणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पो.उप. निरी रविंद्र कस्पटे, तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयाचे अनुषंगाने १०० ते १५० सीसीटिव्ही फुटेज तपासले असता गुन्हा रात्रीच्या वेळी घडला असल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. तद्नंतर तांत्रिक विश्लेषनाद्वारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे रोहीत सुभाष चव्हाण वय २३ वर्षे धंदा रिक्षा चालक रा. गंगानगर लेन नं ७ भेकराईनगर फुरसुंगी हडपसर पुणे हा त्याचे राहते घराचे परिसरात मिळुन आल्याने त्यास त्याने गुन्हयात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेवुन त्याचे कडे तपास करुन तिचे इतर साथीदार
१) मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण वय १९ वर्षे धंदा नोकरी रा. सरवदे यांच्या चाळीत रुम नं ३ गल्ली नं ३ एच पी पेट्रोलपंपाजवळ मंतरवाडी देवाची उरुळी ता हवेली जि पुणे २) सुदर्शन शिवाजी कांबळे वय २२ वर्षे रा. म्हाडा कॉलनीडी / २०७ आर एम डी कॉलेज शेजारी वारजे माळवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांनी दाखल गुन्हयातील चोरी केलेला माल व गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे. श्रीमती नंदिनी वग्यानी यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार मोराळे, तनपुरे, शिंदे, टोणपे, खंदाड, शेख, पवार, घुले, चव्हाण व दुधे यांनी केली



