पुणे शहरात चक्क अफु या अंमलीपदार्थाची लागवड करून शेती करण्यात आली…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहर आयुक्त कार्यालया अंतर्गत परिमंडळ 5 लोणीकाळभोर पोलीस स्टेशन परिसरातील आळंदी म्हातोबाची गावातील परिसरामध्ये चक्क अफु या अंमलीपदार्थाची लागवड करणाऱ्यावर लोणी काळभोर पोलीसांची कारवाई.

आळंदी म्हातोबाची येथील, जगताप मळा रोड चे कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांचे प्लॉटींगचे मागील बाजुस असलेल्या जमीनीमध्ये अफु या अंमलीपदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आलेली आहे. वगैरे मजकुरची गोपनिय खबर लोणी काळभोर पोलीसांना प्राप्त झाली. सदर प्राप्त खबरीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी दोन पंचांसह घटनास्थळी जावुन छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान, आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर ७७५ मध्ये एकुण ४०,०००/- रुपये किंमतीचे, व ४ किलोग्रॅम वजनाचे, ६६ अफु चे झाडे मिळुन आले आहेत.

Advertisement

सदरची आफु ची झाडे दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन ती जप्त करणेत आलेली आहेत. तसेच त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीनमालक महिला नामे मंगल दादासो जवळकर वय ४५ वर्षे रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची ता. हवेली, जि. पुणे योचंविरुध्द एन. डी. पी. एस. अॅक्ट क. ८ ब, १८ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन सदर महिला आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.

सदरची कामगीरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर डॉ. राजकुमार -शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पो. हवा. ८१६७ क्षिरसागर, पो. हवा. २७२० वणवे, पो. हवा. ३८७१ सातपुते, पो. शि. ३५६३ कटके, पो.शि. ४७११ कुदळे, पो. शि. ८१०८ नानापुरे, म.पो.शि. १६१२ निकंबे, म.पो.शि. ४७६३ यादव, पो. शि. २८०३ तेलंगे यांनी केलेली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे आफु ची लागवड करणाऱ्या लोकांविरुध्द यापुर्वीदेखील २ वेळा गुन्हे दाखल करुन कारवाई करणेत आलेली आहे. अशाप्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर लोणी काळभोर पोलीसांचे वतीने कायदेशीर कारवाई करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मा पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!