होळी, धूलीवंदन निमित्त पुणे शहर वाहतूक शाखेकडून तब्बल 50 लाख 94 हजाराची दंड वसुली…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात होळी धूलिवंदन निमित्त एकुण ३७ वाहतूक विभाग व संबंधित पोलीस स्टेशनकडून लावण्यात आलेल्या नाकांबदीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लघन करणारे बेशीस्त वाहन चालकांवर ट्रिपल सिटी, राँग साईड, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, इत्यादी च्या कारवाई अतंर्गत ३८६ वाहने जप्त करून एकुण ६११८ केसेस करण्यात आल्या असुन एकुण ५०,९४,०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेकडुन होळी व धुलीवंदन साजरा करताना पुणेकरांची सुरक्षा व शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने केलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत एकुण ८५५२ वाहनांची तपासणी करून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४०२ तळीरामांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.

Advertisement

महत्वाच्या कारवाईचा तपशील

• ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह – ४०२

• ट्रिपल सिट ९२१

• राँग साईड ८५२

• एकुण केसेस :- ६११८

• एकुण दंडात्मक रक्कम :- ५०,९४,०००/-

अशी माहिती पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे वाहतूक शाखा पुणे शहर यांनी दिली

मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेशकुमार, मा. सहा पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा व मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटिल यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे होळीचा सण आंनदी, सुरक्षित साजरा करता यावा याकरीता शहरातील बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी दिनांक १४/०३/२०२४ रोजी स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत शहरामध्ये ९० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!