बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 60 पथके तयार केली होती. त्याशिवाय, या प्रकरणातील आरोपींचे स्केच जारी करण्यात आले. आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ही घटना घडल्यापासून पुणे पोलिसांची 60 पथके आरोपींचा शोध घेत होती, परंतू तरीही आरोपींचा शोध लागत नव्हता. मात्र आता आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी अख्तर बाबू शेख, सोम्या बापू जाधव आणि चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले आहे. यातील दोघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी कोंढव्यातील राहणारे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement

तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तिघा संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
गुन्हे शाखेने एका आरोपीला जिल्ह्यातून, तर इतर दोन आरोपींना नागपूरमधून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!