स्टॉक मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; तीन कंपन्यांविरोधात गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे : हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६४/२०२५ अन्वये गोल्डन बुल्स, काना कॅपिटल्स आणि ए. बी. कॅपिटल्स या तीन कंपन्यांच्या संचालक मंडळ व एजंटांविरोधात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ४०९, १२०(ब) तसेच महाराष्ट्र संरक्षण गुंतवणूकदार हितसंबंध कायदा (एम.पी.आय.डी.) कलम ३, ४ आणि बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम अॅक्ट कलम २१ व २३ लागू करण्यात आले आहेत. या गंभीर गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपन्यांनी नागरिकांना स्टॉक मार्केट संदर्भात एक महिन्याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणादरम्यान वारंवार कोट्यवधी रुपयांचा नफा होत असल्याचे भासवण्यात आले. गुंतवणूक केल्यास दरमहा जास्तीचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना ना मूळ रक्कम परत करण्यात आली, ना जादा परतावा देण्यात आला. परिणामी शेकडो गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
Advertisement
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून, गुंतवणूक केलेल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या गुंतवणुकीसंबंधी सर्व कागदपत्रांसह युनिट क्र. १, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर, पोलीस आयुक्तालय, पुणे येथे हजर राहावे असे आव्हान पोलिसांनी केले




https://shorturl.fm/DoMHr
https://shorturl.fm/QrFDI